Daniel 7

1बाबेलाचा राजा बेलशस्सर याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडलेला असता त्याला स्वप्न पडले आणि दृष्टांत त्याच्या मनात फिरू लागले मग त्याने ते स्वप्न आणि त्यातील महत्वाच्या घटना लिहून काढत्या. 2दानीएलाने म्हटले, “रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहीले स्वर्गातील चार वारे महासागरावर घोळत होते. 3चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली.

4पहिले सिंहासारखे असून तयास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता तयाचे पंख उपटून त्याला जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते. 5नंतर दुसरे श्वापद अस्वलासारखे होते त्याच्या दातामध्ये तिन फासोळया धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले ‘उठ, पुढे पुष्कळ मांस खा.’

6त्यानंतर मी पुन्हा पाहीले तो आणखी एक श्वापद चित्त्याप्रमाणे होते त्याच्या पाठीवर पक्षासारखे चार पंख होते. आणि त्यास चार शिरे होती. त्याला राज्य करण्यासाठी आधिकार दिला होता. 7त्यानंतर मी रात्री माझ्या स्वप्नात चौथे श्वापद पाहीले, विक्राळ, भयानक आणि अतिशय मजबूत असे ते होते. त्याला मोठे लोखंडी दात होते, ते चावून त्याचा चुरा करी. आणि उरलेले पायाखाली तुडवी ते इतरांपेक्षा वेगळे होते. आणि त्यास दहा शिंगे होती.

8मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होत आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.

9मी पाहत होतो तेव्हा,

आसने मांडण्यात आली
आणि एक पुराणपुरूष आसनावर बसला.
त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती
आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते.
आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते.

10त्याच्या समोर अग्नीची नदी वहात होती,

हजारो लोक त्याची सेवा करीत होते,
लाखो लोक समोर उभे होते,
न्यायसभा चालू होती आणि पुस्तके उघडी होती.

11मी सतत त्याकडे पाहत होतो कारण ते लहान शिंग फुशारकी मारत होते. मी पाहत असता त्या श्वापदाचा वध करण्यात आला त्याच्या शरीराचे तूकडे करून ते जाळण्यास देण्यात आले. 12इतर चार श्वापदाचे प्राण हरण करून त्यांना काही काळ जिवंत ठेवण्यात आले.

13त्या रात्रीच्या माझ्या दृष्टांतात मी पाहिले,

आकाशातील मेघावर स्वार होऊन कोणी मानवपूत्रासारखा येताना मी पाहिला तो पुराण पुरूषाकडे आला
व त्यास त्याने जवळ केले.
14आणि त्याला प्रभुत्व व वैभव व राज्य दिले, ते असे की, सर्व लोक, राष्ट्रे व भाषा यांनी त्याची सेवा करावी;
त्याचे प्रभुत्व सनातन प्रभुत्व आहे, ते टळून जायचे नाही,
आणि जे नष्ट व्हायचे नाही असे त्याचे राज्य आहे.

15मग मज दानीएलचा जिव घाबरा झाला. मला झालेल्या दृष्टांतामुळे माझे मन विचलीत झाले. 16जवळ उभे असणाऱ्यांपैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टींचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला.

17ती मोठी चार श्वापदे म्हणजे पृथ्वीवर उदयास येणारे चार राजे आहेत. 18पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य, प्राप्त होईल ते युगानयुग त्याचा ताब्यात राहील.

19नंतर मला त्या चौथ्या श्वापदा विषयी बोलण्याची इच्छा झाली, जे इतरांपेक्षा वेगळे होते. त्याचे दात लोखंडाचे भयंकर असे होते आणि त्याची नखे पितळेची होती, ते चावून चुरा करी. आणि उरलेले जे होते त्याचे पायाखाली तूकडे करी. 20मला त्याची दहा शिंगे आणि त्याचे गुढ जाणायचे होते जी त्याच्या डोक्यावर होती. एक शिंग त्यामध्ये आणखी निघाले त्यामुळे तीन शिंगे तूटून पडली त्या शिंगाला डोळे असून तोंड होते त्यातून ते मोठमोठ्या गोष्टी बोलत होते. त्या शिंगाची जाडी इतरांपेक्षा जास्त होती. या सगळ्यांचा अर्थ काय म्हणून मी इच्छा दर्शविली.

21मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला. 22आणि दिवसाचा पुरातन येईपर्यंत ते त्यांच्यावर प्रबळ होत गेले. मग परात्पराच्या पवित्र जनांस न्य दिला, आणि पवित्र जनांची राज्य आपल्या मालकीचे करून घेतले, असा समय आला.

23त्याने सांगितले चौथे श्वापद

हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल
हे इतर राज्यांपेक्षा वेगळे राहील ते सर्व
पृथ्वीला ग्रासून टाकील
आणि तिचे पायाखाली तूकडे करीन.
24आता दहा शिंगाविषयी
या राज्यातून दहा राज्यांचा उदय होईल;
आणि त्यातून आणखी एक राजा निघेल.
तो राजा वेगळा असेल आणि तो तीन राजांना पादाक्रांत करील.

25तो सर्वोच्च देवाच्या विरोधात बोलेल

आणि देवाच्या पवित्र जनांचा छळ करील नेमलेले सण
आणि नियम बदलण्याचा तो प्रयत्न करील.
या सर्व गोष्टी त्याच्या हातात तिन वर्षे
आणि सहा महिण्यासाठी दिल्या जातील.
26पण तिथे न्यायसभा होईल
आणि त्याचे राजकीय सामर्थ्य परत घेण्यात येतील.
त्याचा नाश होऊन कायमचा नष्ट करण्यात येईल.

27राज्य, प्रभूत्व

आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल.
त्याचे राज्य अनंतकालचे आहे.
आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञापालन करतील.”

या गोष्टींचा उलगडा इथे संपतो. मी दानीएल या विचारांनी व्याकूळ झालो. माझे तोंड उतरले; पण मी या सर्व गोष्टी मनात ठेवल्या.

28

Copyright information for MarULB